शहर

श्रीनिकेतन हायस्कूल चा निकाल ७८ टक्के

नांदेड/प्रतिनिधी.. दीपक नगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन हायस्कूल माध्यमिक शालांत बोर्ड परीक्षा चा निकाल ७८ टक्के लागला असून शाळेतील संघर्ष सिद्धार्थ भद्रे या विद्यार्थ्याने ९१.८० गुण प्राप्त करून शाळेला घवघवीत यश प्राप्त करून दिले आहे. श्रीनिकेतन हायस्कूलच्या ६२ विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली होती त्यापैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

८०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांत संघर्ष भद्रे ९१.८०, गोविंद शेळके ८७.८०, समाधान पंडित ८७.६०, कु. राजनंदिनी आळणे ८५.६०, संकेश सूर्यवंशी ८१.८०, माधव नव्हाते ८०.६० यांचा समावेश आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुणा नरवाडे, संस्थेचे सचिव कपिल नरवाडे, मुख्याध्यापक यशवंत थोरात,पर्यवेक्षक मोगल ए.के. यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी करून भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नरसिंह विद्यामंदिरचा निकाल ८७ टक्के
महावीर सोसायटी येथील नरसिंह विद्या मंदिर चा शालांत परीक्षेचा निकाल ८७ टक्के लागला असून शाळेतील कु. श्रुती गजानन कलिंदर या विद्यार्थिनीने ९२.४० व कु. शिवकन्या शिवराम आढाव ‌९२.२० गुण प्राप्त करून शाळेला घवघवीत यश प्राप्त करून दिले आहे. नरसिंह विद्या मंदिरातून ५९ विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षा दिली होती त्यापैकी ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांत कु. श्रुती गजानन कलिंदर ९२.४०, कु. शिवकन्या शिवराम आढाव ‌९२.२० यांचा समावेश आहे.यश प्राप्त झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी शाळेतील १० विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे तर प्रथम श्रेणीत १२ व द्वितीय श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, उपाध्यक्ष रवी जाधव , मुख्याध्यापक गव्हाणे व्ही. एम. पर्यवेक्षक कांगणे व्हि.डी. यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी करून भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *