खा. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत, मंत्री विजय शाह यांच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

नांदेड (प्रतिनिधी) – ऑपरेशन सिंदूरचा मुख्य चेहरा असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी मध्यप्रदेशचे भाजपा मंत्री विजय शाह यांनी अवमानजनक व्यक्तव्य केले. दरम्यान नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थित व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात, शनिवार (ता.१७) रोजी मंत्री विजय शाह यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची मागणी देखील करण्यात आली.
देशाचा अभिमान असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बदल मध्यप्रदेशचे भाजपा मंत्री विजय शाह हे अवमानकारक विधान केले, यावर मा. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील मंत्री विजय शाह यांचा राजिनामा भारतीय जनता पार्टी घेत नाही. हाच भाजपाचा खरा चेहरा आहे अशी टिका यावेळी खा. रवींद्र चव्हाण यांनी केली. दरम्यान खा. रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थित व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात, शनिवार (ता.१७) रोजी, नवा मोंढा येथील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत त्यांचा निषेध व्यक्त
करण्यात आला. यावेळी मंत्री विजय शाह यांच्या राजिनाम्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, सुरेंद्र घोडसकर, राजेश पावडे, अनिल मोरे, अब्दुल गफार, बालाजी चव्हाण, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, श्रीनिवास मोरे, अजिज कुरेशी, मुन्ना अब्बास, मुन्तजिब, माधवराव पवळे, नसिम पठाण, ज्योती कदम, रफिक पठाण, दिपकसिंग हजुरीया, संजय वाघमारे, गगन यादव, अतुल पेदेवाड, पिंटू पाटील आलेगावकर, शेख मुख्तार, तुषार पोहरे, धनंजय उमरीकर, गणेश कोकाटे, प्रसेन्नजित वाघमारे, गौतम सिरसाट, गोविंद पाटील, आदीसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



