लोहा : अवकाळी पावसाने रस्त्याचे काम ठप्प, नागरिक आणि शेतकरी त्रस्त

लोहा, १७ मे २०२५ : मे प्रतिनिधी, लोहा महिन्यात अवकाळी पावसाची सुरुवात होताच लोहा – शेवडी – बेटसांगवी – भनगी मार्गे वाडीपाटीलमार्गे नांदेडकडे जाणारा मुख्य रस्ता बंद पडला आहे. या रस्त्याचे सुमारे ५० मीटरचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
या अपूर्ण कामामुळे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व रुग्णवाहिका यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
छायाचित्र – विनोद महाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून नांदेड शहराशी जोडणाऱ्या अनेक गावांचा संपर्क असून, रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे स्थानिक लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
लोकांची मागणी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.



