क्राईम

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी — खून प्रकरणातील ५ आरोपी जेरबंद, वाहनासह मुद्देमाल जप्त

 

नांदेड, १७ मे २०२५ :— प्रतिनिधी, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने खून प्रकरणातील ५ आरोपींना अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी वापरलेले इनोव्हा चारचाकी वाहन (क्रमांक MH-26-AF-7004) किमती ₹२० लाख जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा

कार्यवाहीत सहभागी अधिकारी व कर्मचारी : उदय खंडेराय (स्थानीय गुन्हे शाखा), ओमकांत चिंचोलकर (नांदेड ग्रामीण), ज्ञानेश्वर मटवाड, बाबुराव चव्हाण, व्यंकट कुसमे, गुन्हे शोध पथक व सपोनि. घोगरे, सपोनि. रवि वाव्हुळे,
सायबर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ ओडणे आदींचा समावेश होता.

अटक आरोपींची नावे : सिद्धेश्वर ऊर्फ पवन सुदाम पुयड (वय 20, रा. पुणेगाव), विशाल विष्णु मोरे (वय 21, रा. व्यंकटेश नगर), ओमकार ऊर्फ सोन्या मुरलीधर मोरे (वय 19, रा. वसरणी), दत्ता लक्ष्मण मोरे (वय 26, रा. वसरणी), विधीसंघर्षग्रस्त बालक

मा. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, पो.नि. उदय खंडेराय आणि पो.नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली सहा विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी नांदेड व परिसरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ₹२० लाख किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. विजयकुमार कांबळे करीत असून आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी (पीसीआर) मंजूर करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलीसांचे पथक अजूनही कार्यरत आहे.

पोलीस अधीक्षकांनी सर्व पथकाचे कौतुक केले असून, तपासासाठी अधिक हालचाली सुरू आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *