क्राईम

रेल्वे पोलिसांचं चोरांना पाठबळ; सीसीटीव्ही कॅमेरात चोर कैद होऊनही पंधरा दिवसापासून पोलीसांना सापडेना

 

नांदेड प्रतिनिधी : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हे हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकामध्ये बातमी संकलन करण्यासाठी गेले असता चोरट्याने त्यांचा मोबाईल क्षणातच लांबविला. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही पंधरा दिवस ओलटले तरी रेल्वे पोलीसांना अद्यापही सापडेणा. या चोरांना रेल्वे पोलिसांचं पाठबळ आहे की काय अशी चर्चा तक्रारदार व प्रवाशांमधून होताना दिसत आहे,

सविस्तर वृत्त असे की, पंधरा दिवसापूर्वी एका न्यूज चैनल चे पत्रकार हे रेल्वे स्थानकात चित्रीकरण करण्यासाठी गेले व त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा मोबाईल चार्जिंगसाठी प्लॅटफॉर्म नंबर चारवर लावला असता काही क्षणातच चोरट्याने तो मोबाईल नजर चुकूवून लंपास केला. या चोरांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पत्रकारांनी याबाबत रेल्वे पोलीसांकडे रितसर तक्रारही दाखल केली आहे परंतु अद्यापही पंधरा दिवसांपासून चोरटे रेल्वे पोलिसांच्या हाती येत नाहीत. त्या चोरांना ओळखणारी महिला सुद्धा निष्पन्न झालेली असताना ती २४ तास नशेत रेल्वे स्थानक परीसरातच राहते नशा उतरल्यावर आम्ही तीला विचारणा करू हि रेल्वे पोलीसांची भूमिका संशयास्पद जाणवते तर जाणून बुजूनच रेल्वे पोलीस त्यांना अटक करत नाहीत हेच स्पष्ट होतांना दिसत आहे.

पत्रकारांचा मोबाईल पंधरा दिवसापासून चोरीला गेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची ही अवस्था तर सामान्य नागरिकांचे व रेल्वे प्रवाशांचे काय हाल होत असावेत. हजारो रुपयांच्या वस्तू चोरटे हातोहात लंपास करतात परंतु रेल्वे पोलीस मात्र शोभेच्या वस्तू सारखे दिसून येतात चोरट्याला पकडत नाहीत किंवा चोरट्याला अटकही करत नाहीत. त्यांच्यावर थातूर मातूर कारवाई करून पकडण्याचं तक्रारदांना नाटक करून दाखवतात परंतु अद्यापही पंधरा दिवसापासून एका पत्रकारांचा चोरीला गेलेला मोबाईल रेल्वे पोलिसांना सापडत नाही यावरून हे सिद्ध होते की जाणून बुजून रेल्वे

पोलिसांचं चोरांना पाठबळ दिसून येत आहे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद होऊनही त्या चोरट्या टोळीचा तपास रेल्वे पोलिसांना लागत नाही हि आश्चर्याची बाब आहे तर रेल्वे पोलिस आणि चोरांचे धागेदोरे मिळालेले असून चोरी गेलेली वस्तू खरेदी करणा-याकडूनच गबाड काढण्याचा हा सध्या मोठ्या प्रमाणात गोरख धंदा रेल्वे पोलिस आणि चोरांमध्ये सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. तर वरिष्ठांनी हुजुर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन येथे आजवर घडलेल्या चोरीच्या घटना, झालेल्या रिकव्हरी व निष्पन्न झालेले एकुण चोरटे व तपासणीस यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *