खैंरगाव बु.ग्रामपंचायत कार्यालय व पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
मतदार संघातील शाळा, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी व ईतर सर्व कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही-आमदार अँड.श्रीजया चव्हाण

अर्धापूर:- उध्दव सरोदे – मतदार संघातील प्रत्येक गावातील विकास कामांना निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच मतदार संघातील शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. शाळेत चांगले शिक्षण मिळत असते व घरातील वडीलधारी मंडळी चांगले संस्कार करून सक्षम पिढी निर्माण करतात तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे काम असून ज्येष्ट नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे अशी माहिती लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन करून मनोगत व्यक्त करताना भोकर विधानसभेच्या आमदार अॅड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी शनिवार (ता १७) खैरगाव बुद्रुक (ता अर्धापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालय व पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात माहिती दिली.
खैरगाव ग्रामपंचायत कार्यालय हे सुमारे २५ लाखांचा निधी खर्चुन बांधण्यात आले आहे तर जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली असून या दोन्हींचे लोकार्पण आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बालाजी गव्हाणे पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. खैरगांव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात एका छोट्याशा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर, भाऊरावचे संचालक अॅड.सुभाष कल्याणकर,अनु.जाति जमाती भाजपा जिल्हाध्यक्ष विलास साबळे, प्रा.कैलास दाड, नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख,
राजकुमार जाधव, बाळू पाटील धुमाळ,भगवान पाटील तिडके,अमोल डोंगरे,निळकंठ मदने, व्यंकटी राऊत,राजु शेटे,योगेश हाळदे, गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम, नायब तहसीलदार सुनिल माचेवाड, स्विय सहाय्यक एकनाथ खानसोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्याचे प्रास्ताविक सरपंच दत्ता पाटील नादरे यांनी करून गावातील विविध विकास कामांची माहिती दिली व गावातील विकास कामांना निधीची मागणी केली.यावेळी माजी सरपंच प्रकाश इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी आरती नादरे,संभाजी नादरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचे सुत्रसंचलन उपसरपंच संजय गोवंदे यांनी केले तर आभार डॉ.शिंदे यांनी मानले.
यावेळी पोलीस पाटील डॉ.पुजा ठेंगे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी वामनराव उबाळे,उत्तमराव लोमटे,आनंदराव कपाटे,वसंतराव कपाटे,नवनाथ कपाटे,बाळू माटे,समाधान शिंदे, राजाराम गायकवाड,राजु पवार,शंकर ढगे,देवराव अडकिणे,दिगांबर तिडके, ग्रामविकास अधिकारी कांता सुरनर, सुरेश पत्रे,गणेश आडे,शाखा अभियंता पुनम बिराजदार,तलाठी संभाजी घुगे,हुमा खान,धनराज सोळंके,शिवाजी आयने,तुकाराम कानगुलकर,रमेश मुंगल,ओमसिंह ठाकुर,गंगाधर सोळंके,मानिक सोळंके,राम इंगोले आदी उपस्थित होते.



