मराठवाडा

पारंपारिक पद्धतीने मराठवाड्यातील नामवंत सुफी संत हजरत सय्यद अखुंद शाह बाबा रहे याचा संदल सपन्न…!

 

परभणी शहरातील वसमत रोडवरील मराठवाड्यातील प्रसिद्ध सुफी संत सय्यद अखुंद शाह बाबा याचा संदल शुक्रवारी दुपारी शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढून मानाची चादर चढवण्यात आली या वेळी परभणीच्या व इतर जिल्ह्यातील व राज्यातील भाविक भक्त उपस्थित

मागील 100 पेक्षा जास्त वर्षापासून सय्यद अखुंद शाह बाबा रहे हे वसमत रोड वरील शमशान जवळ त्यांची दर्गा असून दर्गा सांभाळणारे मुत्ववली यांनी 77व्या वर्षापासून या ही वर्षी चांगल्या प्रकारे येणाऱ्या भाविक भक्तांना लंगरची सोय करण्यात आली होती ज्यात जास्त करून महिलांची व पुरुष भाविक भक्त यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती

15 मे ला घुसल तर 16 मे ला संदल व 17 मेला कव्वालीच्या कार्यक्रम असा संदल कमिटीच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आले होते

शनिवारी उर्सानिमित्त कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यात मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल सुलतान नाझा यांची उपस्थिती होती कव्वालीलाही मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी प्रतिसाद दिला असून तीन दिवस चालणाऱ्या हजरत सय्यद अखुंद शाह बाबा रहे यांचा 77व्या उर्स यशस्वी करण्यासाठी शेख चांद शेख नबी, शेख युनूस शेख सलीम सोफी, शेख नदीम शेख नजीर मुतवली व संदल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *