जात वैधता प्रमाणपत्र व वस्तीगृह प्रवेशासह पद्मशाली समाजातील एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी भेट

नांदेड: समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे SBC प्रवर्गातील विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र व वस्तीगृह प्रवेशासह इतर विविध सवलती व त्यामध्ये येत असलेल्या विवीध अडचणी संदर्भात पद्मशाली समाजातील एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्या सोडविण्या सदर्भात चर्चा करण्यात आली. जात पडाळणी प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यासाचे आश्वासन संबंधित अधकाऱ्यांकडून देण्यात आले.
सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय नांदेड येथे दि.16.05.2025 रोजी श्री. महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष नागभूषण दुर्गम, धर्माबाद येथील विशेष मागास प्रवर्ग (SBC) चे धडाडीचे कार्यकर्ता तथा उपोषणकर्ते शिवशंकर सुरकुटलावार,आ.भा. मराठवाडा युनाइटेड संघटनेच्या नांदेड महिला जिल्हाध्यक्ष सौ. डॉ. प्रगतीताई निलपत्रेवार,व युनाइटेड संघटनेचे अन्ना आनलदास, महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्यसचिव संतोष गुंडेटवार, जिल्हाध्यक्ष, विजय चरपिलवार, जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी निलपत्रेवार, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद रामदीनवार,
ई.पद्मशाली समाज बांधव उपस्थितीत भेट दिली व विशेष मागास प्रवर्ग (SBC) महाराष्ट्र शासना कड़ून लागू असलेल्या शासकीय योजना,नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्ज व अनुदान, जात पड़ताळनी (व्हॅलिडीटी) समस्या ,विद्यार्थ्यांना वसतिगृह व इतर प्रशासकीय योजना समाज बांधव याना सुलभ रित्या मिळवून घेण्यासाठी सविस्तर माहिती या समाज कल्याण कार्यालयातील विविध कार्यालय विभाग प्रमुख यांच्या कड़ून देण्यात आली



