नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगिरी: हिरो शोरूममधून चोरी गेलेली मोटारसायकल अवघ्या काही तासांत जप्त, १९ वर्षीय आरोपी अटकेत

नांदेड | प्रतिनिधी: नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिडको येथील श्री. साई मोटर्स शोरूममधून चोरीस गेलेली हिरो प्लस कंपनीची नविन मोटारसायकल अवघ्या काही तासांत शोधून काढण्यात नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यात रोहन सुरेश भोळे (वय १९, रा. बळीरामपूर, नांदेड) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ₹६५,०००/- किंमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस यंत्रणेची तात्काळ कारवाई ही कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत निर्देशानुसार पार पडली.
मार्गदर्शक अधिकारी: सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, नांदेड ग्रामीण
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार: पो.उप.नि. ज्ञानेश्वर मटवाड, पोहेकॉ. केंद्रे (273), पोकों. पवार (389), पोकॉ. माने (221), आवळे (703), पचलिंग (599), कल्याणकर (946) — सर्व पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे कार्यरत.
घटनेची सविस्तर माहिती प्रेमसिंह गोविंदसिंह ठाकूर (वय ३६), व्यवसाय – मॅनेजर, रा. हिंगोली गेट, नांदेड
घटना: दि. १६ मे २०२५ रोजी रात्री ७ वाजता शोरूम बंद करून गेलेले ठाकूर दि. १७ मे रोजी सकाळी ९.३० वाजता शोरूम उघडण्यासाठी आले असता लक्षात आले की, वरच्या मजल्यावर नेणाऱ्या रॅम्पच्या दरवाजाचे कुलूप तोडून एक नवीन हिरो प्लस मोटारसायकल चोरीस गेली आहे.
मोटारसायकलचे तपशील: चेसीस क्रमांक: MBLHAW477S5D06793, इंजिन क्रमांक: HA11FCS5D10378, अंदाजे किंमत: ₹६५,०००/-
या तक्रारीवरून गु.र.नं. 475/2025 कलम 305, 331(2), 331(4) भारतीय न्याय संहिता-2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीची ओळख पटवून मुद्देमाल जप्त
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ तपास सुरू केला. रोहन सुरेश भोळे याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आली.
पोलीस दलाचे अभिनंदन ही यशस्वी कारवाई करणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले असून, पुढील तपास पो.हे.को. (ब.नं. 640) गुट्टे करीत आहेत.
ही घटना “ऑपरेशन फ्लश आऊट”च्या यशाचे एक उत्तम उदाहरण ठरली असून, नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.



