एज्युव्हिजन कोचिंग क्लासेसचा एम.डी. आयान तालुक्यात प्रथम……

अर्धापूर:- उध्दव सरोदे – शहरातील नामांकित एज्युव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूटने याही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत क्लासेसचा विद्यार्थी एम.डी आयन याने 87.40% गुण इंग्रजी माध्यमातून इयत्ता दहावीच्या परीक्षेत घेवून तालुक्यामधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे त्याबद्दल त्याचे विविध स्तरातून खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.
आयनने त्याच्या यशाचे श्रेय अतिशय हलाकीच्या परिस्थितीशी संघर्ष करून उच्च दर्जाचे शिक्षण देणारे वडिल तसेच एज्युव्हीजन कोचिंग इन्स्टिट्यूट चे संचालक प्रवीण रावते सर व शिक्षक वृंद यांना दिले आहे.
याच बरोबर गायत्री वायाळ हिने 83.40% घेऊन क्लासेस मधून दुसरी आलेली असून सय्यद आफिफ 81%,करण राठोड 79.60%,रुचिता उप्पलवार 79%,सुरज वाडकलकर 73.20%, शेख सैफ 73.20%,साई लोखंडे 72.20%,समर्थ माटे 72%,अमित खोंडे 71%,अरविंद कोळी 67.40%, माटे प्रणव 65.40%,वैभव बाचोटी कर 65.20%,यश मुंढे 64.20%, सुमेध कोल्हे 63%,ऋतुराज गोरे 55% नागेश कपाटे 53.40%,तुषार पांचाळ 52%.आदी विद्यार्थ्यांनी वरील प्रमाणे गुण घेवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल क्लासेसचे संचालक श्री प्रवीण रावते सर व ईतर सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.



