नांदेड : गोदावरी नदी घाटावर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर धडक कारवाई, तब्बल 2 कोटी 58 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी): गोदावरी नदी घाटावर अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि उस्माननगर पोलिस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 2 कोटी 58 लाख रुपयांचा वाळू उपशासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नेतृत्व
ही कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड – IPS) यांच्या आदेशावरून व मा. श्री. सुरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईचे नेतृत्व: उदय खंडेराय – पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, एम.डी. मुळे – सहाय्यक पोलीस निरीक्षक, उस्माननगर, विठ्ठल घोगरे, आनंद बिचेवार, मिलिंद सोनकांबळे, आशिष बोराटे, महेश कोरे, माधव केंद्रे आदी पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार सहभागी
कारवाईची ठळक माहिती
दिनांक 20 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, येळी, कोटगाव व चिंचोली (ता. नांदेड) येथील गोदावरी नदीच्या रेती घाटांवर छापा टाकण्यात आला. यावेळी अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल
| तपशील | संख्यात्मक माहिती | अंदाजित किंमत |
|---|---|---|
| जेसीबी मशिन्स | 05 | ₹1,56,00,000 |
| रेती उपशाचे इंजिन्स | 09 | ₹27,00,000 |
| हायवा व 05 ब्रास रेती | 01 हायवा + रेती | ₹45,25,000 |
| टिपर | 01 | ₹15,00,000 |
| तराफे | 48 | ₹12,00,000 |
| 55 ब्रास रेती साठा | – | ₹2,75,000 |
| एकूण मुद्देमाल | – | ₹2,58,00,000 |
या कारवाईदरम्यान वाळू उपसा करणाऱ्या व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक
सदर धडक कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि उस्माननगर पोलिस स्टेशनच्या पथकांचे विशेष कौतुक केले आहे. ही कारवाई नांदेड जिल्ह्यातील अवैध वाळू उपशावर प्रभावी लगाम घालणारी ठरली आहे.



