जिला

जिल्ह्यात पर्यावरण, आरोग्य व स्वच्छतेविषयी विविध उपक्रम

आजपासून प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनासाठी विशेष मोहिम - मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती

 

नांदेड, 21- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण व स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत नांदेड जिल्ह्यात गावपातळीवर विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

दिनांक 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तसेच प्लास्टिक संकलन, एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर कमी करणे तसेच कचऱ्याचे वर्गीकरण याविषयी जनजागृती केली जाणार आहे. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेनुसार प्लास्टिक कचऱ्यापासून उपयोगी वस्तू तयार करण्याचे उपक्रमही राबवले जातील. सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण व स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात आजपासून पर्यावरण शपथ घेऊन करण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सीईओ मेघना कावली यांनी केले आहे.

दिनांक 28 मे रोजी मासिक पाळी व्यवस्थापन दिन साजरा करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा व अंगणवाड्यांमार्फत किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता व सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत माहिती देण्यात येईल. यासाठी आरोग्य कर्मचारी, महिला बचत गट, महिला शिक्षिका, आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या यांचा सहभाग राहील. दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये साजरा केला जाणार आहे. यंदाची थीम एक पृथ्वी, एक आरोग्य अशी असून, योग सत्रांच्या माध्यमातून नैसर्गिक जीवनशैली व मानसिक-शारीरिक आरोग्याचे महत्‍व पटवून देण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन गटविकास अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांनी नियोजनपूर्वक करावे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हे उपक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *