नांदेड जिल्ह्यात सायबर शाखेची मोठी कामगिरी – १८.७२ लाखांचे १३२ हरवलेले मोबाईल हस्तगत

नांदेड | २१ मे २०२५ : नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांवरून व बाजारातून हरवलेले महागडे मोबाईल शोधून काढण्याच्या मोहिमेमध्ये सायबर शाखेने मोठे यश मिळवले आहे. या मोहिमेत एकूण १३२ अँड्रॉईड मोबाईल, किंमत अंदाजे ₹१८,७२,०००/- इतक्या किंमतीचे, शोधून काढून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार (IPS) यांच्या आदेशानुसार, सायबर पोलीस निरीक्षक श्री. धिरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सायबर सेल, स्थानीक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकांनी ही मोहीम राबवली.
शोधलेल्या मोबाईल्सचा IMEI क्रमांक ‘Nanded Police’ च्या Facebook व Twitter पेजवर प्रसिद्ध करण्यात आला असून, ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते, त्यांनी आपले IMEI क्रमांक ओळखून सायबर पोलीस स्टेशन, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल शोध मोहिमेतील सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पोउपनि एम.बी. चव्हाण, पो.अं. राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद पिडगे, किशोर जैस्वाल, काशीनाथ कारखेडे, दिपक शेवाळे, ज्ञानेश्वर यन्नावार, दिपक राठोड, मपोकॉ कांचन कसबे, शुभांगी जाधव, रेश्मा पठाण, व्यंकटेश सांगळे यांनी ही महत्त्वाची कामगिरी बजावली.
महत्वाचे: मा. पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, CEIR पोर्टलवर (https://ceir.gov.in) हरवलेल्या मोबाईलची माहिती त्वरित अपलोड करावी, जेणेकरून मोबाईल शोधण्यात अधिक मदत होईल.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व पथकांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



