शहर

वजीराबाद पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने दिव्यांगाच्या हस्ते वृक्षारोपण

 

नांदेड प्रतिनिधी दि, २१ मे / पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या वतीने आज दिनांक २१ मे २०२५ रोजी वजीराबाद पोलीस स्टेशन परीसरात अंध दिव्यांगाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
ठाणे परिसरामध्ये झाडे लावून पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे,

जाकीर नर्सरी दाबड तालुका अर्धापूर यांनी वजीराबाद पोलीस स्टेशनला 30 झाडांची रोपे देऊन सहकार्य केले आहे,
वजीराबाद पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या 30 रोपट्यांचे वृक्षारोपण करून संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.यावेळी अंध दिव्यांग नागनाथ कामजळगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, बेरोजगार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह वजीराबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *