कृषी

अनधिकृत खत विक्रीप्रकरणी पोलिस कारवाई; इस्‍लापूर येथे गुन्‍हा दाखल

 

नांदेड,23- जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी अनधिकृतरित्या कृषि निविष्ठांची विक्री होत असल्यास तात्काळ पोलिस कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात भरारी पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

      या आदेशानुसार किनवट तालुक्यातील मौजे शिवनी येथे एक व्यक्ती विनापरवाना गावोगावी जाऊन सेंद्रिय व इतर खते विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागास प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून सदरील खते व वापरण्यात आलेली वाहनासह माल जप्त करून इस्लापूर पोलीस ठाणे  ता. किनवट येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

     सदर कारवाई विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांनी पार पाडली. गुन्हा दाखल करण्यास जिल्हा मोहिम अधिकारी सचिन कपाळे, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, तसेच जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अमोल पेकम यांनी सहकार्य केले. या कारवाईत एकूण 14 लाख 64 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      कृषी विभागामार्फत सर्व शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विनापरवाना अनधिकृत खते किंवा बियाणे खरेदी करू नये. तसेच अशा प्रकारची विक्री निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *