इतवारा पोलिसांच्या कोंबींग ऑपरेशनमध्ये दोन खंजर व दोन मोबाईल जप्त, आरोपीना अटक

नांदेड, २४ मे २०२५: कोंबींग ऑपरेशन दरम्यान इतवारा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली असून दोन खंजर जप्त करून माला विरूद्धचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईत एकूण ५०,००० रूपये किमतीचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. खंडेराय धरणे व मा. श्री. सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुशीलकुमार नायक, तसेच पोलीस निरीक्षक श्री. रणजीत भोईटे आणि श्री. संजय शिंदे यांच्या देखरेखीखाली ही कामगिरी पार पडली.
गुन्हे शोध पथकात परि. पोउपनि पंकज इंगळे, पोहेकों बंडु कलंदर, मोहन हाक्के, लक्ष्मण दासरवार, धिरजकुमार कोमुलवार, बबन बेडदे, काकडे, पोकों शेख जावेद, रेवन्नाथ कोरनुळे, नजरेआजम देशमुख, बारोळे, चुकलवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गुन्हेगारांची नावे: सागर ऊर्फ शेंडी पि. भारत काळे (२६ वर्षे, रा. शांतीनगर, नांदेड), श्यामसुंदर ऊर्फ सोनु पि. राजु सुर्यवंशी (१९ वर्षे, रा. शांतीनगर, नांदेड)
जप्त मुद्देमाल: गु.र.नं. १६९/२०२५ व १७०/२०२५ मधील दोन खंजर (किंमत: ६०० रुपये) गु.र.नं. १४४/२०२५ मधील दोन मोबाईल (किंमत: ५०,००० रुपये)
दिनांक २३ मे रोजी सकाळी ४ ते ८ दरम्यान कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले. गोपनीय माहितीवरून हिरा मेडीकल समोर, पहेलवान टी हाऊस आणि पशुवैद्यकीय दवाखाना (देगलूर नाका, नांदेड) परिसरात दोन आरोपींना खंजरांसह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी श्यामसुंदर ऊर्फ सोनु याने माला विरूद्धचा गुन्हा केल्याचे मान्य केले. गुन्ह्यातील दोन मोबाईलही जप्त करण्यात आले.
सदर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिक्षकांनी यशस्वी कारवाईबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.



