ऑलिंपिक असोसिएशन नांदेड च्या अध्यक्षपदी जशविंदरसिंग रामगडिया तर सचिव पदी डॉ. राहुल वाघमारे यांची निवड

आज दिनांक 28 मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभा मध्ये ऑलम्पिक असोशियन नांदेडच्या अध्यक्षपदी जसविंदरसिंग रामगडिया यांची तर डॉ. राहुल वाघमारे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. तसेच चेअरमन पदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांचे बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.. ऑलम्पिक असोसिएशन नांदेड तर्फे वर्षभरात विविध अशा उपक्रमाचे आयोजन करण्याचे डॉ. राहुल वाघमारे यांनी सांगितले. 23 जून ते 29 जून 2015 ओलंपिक सप्ताह तसेच गुणवंत क्रीडा पुरस्काराचे घोषणा पण यावेळी करण्यात आली..
जावळी संघटनेचे माजी सचिव बालाजी जोगदंड, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी विनोद गोस्वामी रामन बैनवाड डॉ.राजेश जांभळे विनोद जमदाडे डॉ दिनकर हंबर्डे डॉ. भीमसिंग मुनीम असे क्रीडा क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित होते



