जिला
लोहा : तहसील कार्यालयात दर सोमवारी लोकशाही दिन सुरु करण्याची काँग्रेसची मागणी
लोहा (ता. लोहा) : तहसील कार्यालयात दर महिन्याच्या सोमवारी लोकशाही दिन सुरु करावा, या मागणीसह इतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार पाठक यांना देण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील दिघे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
या प्रसंगी काँग्रेसचे तालुका कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, चंद्रकांत पाटील नळगे, दिगंबर किरवले, शंकर दिघे आदींची उपस्थिती होती. या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात नियमितपणे नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी लोकशाही दिन पाळला जावा, अशी मागणी केली. 📸 छाया : विनोद महाबळे



