क्राईम

गांजा विक्रीच्या अड्ड्यावर छापा : दोन आरोपींना अटक, 1.050 किलो गांजा जप्त

 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील पाकीजा फंक्शन हॉल रोड, गटारा जवळ मोकळ्या जागेत दोन इसमांकडून 1.050 किलो अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने 21,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोउपनि महेश कोरे, पोउपनि आनंद बिचेवार, पोहेकॉ मिलींद नरबाग, पोहेकॉ प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ रवि बामणे, पोहेकॉ गंगाराम जाधव, पोकों चंद्रकांत स्वामी, पोकों विश्वनाथ पवार, पोकों राजेश डोंगरे, चालक पोकों बिचकेवार यांनी कामगिरी बजावली.

आरोपींची मोहम्मद अली मोहम्मद चाऊस ऊर्फ बाबु (वय 20, व्यवसाय बेकार, रा. हतई करवला, नांदेड), मोहम्मद रिजवान मोहम्मद दस्तगीर (वय 20, व्यवसाय बेकार, रा. पाकीजा फंक्शन हॉल मागे, हिलालनगर, नांदेड)

जप्त मुद्देमाल 1.050 किलो वजनाचा ओलसर हिरवट रंगाचा गांजा (पाला, काड्या, बिया मिसळलेला), किंमत प्रती किलो 20,000 रुपये, एकूण 21,000/- रुपयांचा मुद्देमाल.

अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दिनांक 28 मे 2025 रोजी पाकीजा फंक्शन हॉल रोड, गटारा जवळ मोकळ्या जागेत दोन इसम बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.

सदरची धडक कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे. जप्त मुद्देमालासह आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *