नांदेडमध्ये सराईत गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई : हार्सल कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध

नांदेड : जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलीस दलाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार संघरत्न ऊर्फ डोरोमॅन पि. माधव वाघमारे (वय 18, रा. शाहुनगर, वाघाळा, नांदेड) यास MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यान्वये एक वर्षासाठी हार्सल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले.
श्री. सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा, श्री. उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, श्री. ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण आणि पोकों. तिरुपती तेलंग यांनी महत्त्वपूर्ण कामकाज पाहिले.
आरोपीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आरोपी संघरत्न वाघमारे याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे – गंभीर दुखापत, दंगा करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे व वापरणे आदी प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर पो.नि. ओमकांत चिंचोलकर यांनी MPDA अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावात कुठलाही त्रुटी न राहावा यासाठी श्री. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती तेलंग यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली.
जिल्हा प्रशासनाची निर्णायक भूमिका राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी आरोपी संघरत्न ऊर्फ डोरोमॅन वाघमारे यास धोकादायक व्यक्ती घोषित करत त्यास दिनांक 28 मे 2025 रोजी एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हेगारांवर कठोर नजर जिल्ह्यात 2024 मध्ये 13 व 2025 मध्ये 10 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तसेच, 87 गुन्हेगारांना कलम 55 अन्वये व 3 गुन्हेगारांना कलम 56 अन्वये हद्दपार करण्यात आले आहे. अबिनाश कुमार यांनी सांगितले की, कायद्याचा आदर करणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील.



