जिला

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन; 68 जोडप्यांना 34 लाखांचे आर्थिक सहाय्य

पात्र लाभार्थ्यांनी समाजकल्याण विभागात अर्ज सादर करावेत

 

नांदेड, 3- सामाजिक समता, एकात्मता व जातीय भेदभावाच्या निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य देण्याची योजना समाजकल्याण विभागामार्फत प्रभावीपणे राबवली जात आहे. सन 2024-25 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 68 जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला असून, एकूण 34 लाख रुपयांचे अनुदान त्यांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेचे समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार यांनी दिली आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींमधील व्यक्तींनी जर सवर्ण हिंदू, लिंगायत, जैन किंवा शीख समाजातील व्यक्तीशी विवाह केला, तर अशा जोडप्यांना प्रति जोडपे 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच या घटकांतील अंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनाही ही योजना लागू आहे.

या योजनेचा उद्देश सामाजिक सलोखा वाढवणे व जातीय भेदभाव दूर करून समानतेचा संस्कार समाजात रूजवणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – विवाह नोंदणी प्रमाणपत्र, पती/पत्नीचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला (तहसीलदार यांच्याकडून), शाळा सोडल्‍याचा दाखला, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस, संयुक्त शपथपत्र, विवाहाचे छायाचित्र, पती व पत्नीचे आधार कार्ड, पती-पत्नीचे संयुक्त राष्‍ट्रीयकृत बँकेत बँक खाते. ही सर्व कागदपत्रे विहित नमुन्यात सादर करणे आवश्‍यक आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *