क्राईम

पोस्टे भोकर हद्दीत जबरी चोरी करणारे तिघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड, दि. ४ जून २०२५ – पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड अंतर्गत कार्यरत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी प्रकरणात तीन आरोपींना अटक करून एकूण ७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या उल्लेखनीय कारवाईने नांदेड जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई मा. श्री. अभिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. खंडेराव धरणे (अप्पर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. सूरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड) आणि श्री. उदय खंडेराय (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वात पार पडली.

अटक आरोपींची नावे: अरविंद बाबुराव आडेपवार, वय २० वर्षे, व्यवसाय: शिक्षण, रा. सोनारी, ता. भोकर, विजय भिमराव आंबटवाड, वय २१ वर्षे, व्यवसाय: ऑटो चालक, रा. सोनारी, गणेश उर्फ बाळया बालाजी आमदरे, वय २० वर्षे, व्यवसाय: मजुरी, रा. सोनारी

जप्त मुद्देमाल: नगदी रक्कम: ₹१५,०००/-, मोबाईल फोन: ₹५,०००/-, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी: ₹५५,०००/-, एकूण किमतीचा मुद्देमाल: ₹७५,०००/-

“ऑपरेशन फ्लश आउट” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. श्री. महेश कोरे यांच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून सेवालाल चौक, भोकर येथे संशयित आरोपींना पकडले. चौकशीत त्यांनी पो.स्टे. भोकर गु.र.नं. १७२/२०२५, कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपींना पो.स्टे. भोकरच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पथकातील उल्लेखनीय अधिकारी: पो.उ.नि. माधव केंद्रे, पोहेकॉ. गणेश लोसरवार, पोहेकॉ. मिलींद नरबाग, पो.कॉ. बालाजी यादगीरवाड, पो.कॉ. महेश बडगु, चा.पो.कॉ. सुधाकर देवकत्ते

सायबर सेल: पोहेकॉ. राजू सिटीकर, दिपक ओढणे या धाडसी आणि यशस्वी कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी पोलीस अधिकारी आणि अमंलदारांचे कौतुक केले आहे.

संपर्कासाठी: स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *