जिला
शिक्षकांच्या निवृत्तीविषयक तक्रारींसाठी जिल्हा परिषदेत येत्या 10 जून रोजी पेंशन अदालत

नांदेड, 5- जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या तसेच आगामी सहा महिन्यांत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीविषयक तक्रारी, अडचणी तसेच शंका दूर करण्यासाठी पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पेंशन अदालत मंगळवार दिनांक 10 जून रोजी, सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडणार आहे. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेऊन तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. या उपक्रमातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, अडचणींचे निराकरण तसेच निवृत्तीवेतन प्रक्रियेत सुसूत्रता मिळणार असून, याचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केले आहे.



