शहरात ईद उल अझहा मोठ्या उत्साहात साजरी, देशात सुख शांतीसाठी सामूहिक हाफिझ मेहराज उल् हसन यांनी केली दुआ

(मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम)
मुस्लिम समाजातील अनेक धार्मिक पर्व असून त्यातील इस्लामी कॅलेंडरच्या शेवटच्या महिन्यातील झिल हज महिन्याच्या 10 व्या दिवशी मुस्लिम धर्मीय ईद उल अझहा अर्थातच बकरी ईद साजरी करतात शहरात आज दिनाक 07 जून रोजी सकाळी ठीक 08.30 ईदगाह मैदानावर ईद उल अझहाची नमाज हाफिझ मेहराज उल् हसन यांनी पठन करत देशात सुख, शांती ,राष्ट्रीय एकात्मता सह समृध्दी लाभो अशी दुआ महणजेच प्रार्थना केली
मुस्लिम धर्मिय झिल हज महिन्यात सौदी अरेबिया येथे आयोजित होणाऱ्या हज या पवित्र यात्रेसाठी आपल्या आर्थिक आयपतीनुसार जीवनात एकदा ही पवित्र यात्रा करतात आणि पुन्हा एकदा नवीन जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली आहे असेच हदीसद्वारे प्रमाणित किंवा सिद्ध झाले आहे.
मुदखेड पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गवई, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील,
पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बलवीर ठाकूर, राघूवंशी, आडे सहित 30 होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.
याप्रसंगी नव्यानेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यकारणीत निवड झालेले संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कोलते आणि नगरपरिषदेत कंत्राटी पद्धतीने काम करणारे पर्यवेक्षक सुनील माळी यांनी मुस्लिम धर्मियांना गळाभेट करत शुभेच्छा दिल्या.



