भोकर विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावे
आमदार अँड श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्याकडे अर्धापूर तालुका पत्रकार संघाची मागणी

(गुणवंत विरकर, अर्धापूर)
अर्धापूर दि.7 (ता.प्र.) भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड भोकर या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात यावे.या मागणीचे निवेदन अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर यांनी भोकर विधानसभेच्या आमदार अँड श्रीजया अशोकराव चव्हाण यांना दिले आहे.
मागील अनेक वर्षापासून डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर , मुदखेड भोकर या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना स्कूल बॅग,वह्या, कंपास बॉक्स व अन्य साहित्य देण्यात येत होते. कोविड काळात हा उपक्रम थांबविण्यात आला होता. यावर्षीपासून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पुन्हा राबविण्यात यावा.अशी मागणी अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतिने आमदार अँड श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.यावेळी नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, पत्रकार निळकंठ मदने पाटील, उत्तमराव लोमटे बारडकर यांची उपस्थिती होती.
डॉ शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मिळत होता आधार – गुणवंत विरकर
डॉ शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत भोकर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना हजेरी पटाप्रमाणे शालेय साहित्याचे दरवर्षी वाटप करण्यात येत होते.कोविड काळात हा उपक्रम थांबविण्यात आला. विद्यार्थ्यांना व पालकांना आधार मिळणारा व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आता पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर यांनी आमदार अँड श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.



