नांदेड ग्रामीण पोलीसांची जुगार अड्ड्यावर धाड – 2,40,710/- चा मुद्देमाल जप्त

नांदेड (दि. ८ जून): पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने बळीरामपुर येथे एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण ₹2,40,710/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेले पत्ते, रोख रक्कम आणि चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, मा. श्री. खंडेराव धरणे (भोकर), उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा मा. श्री. सुशीलकुमार नायक, तसेच पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर (नांदेड ग्रामीण) यांनी विशेष मार्गदर्शन केले.
गोपनीय माहितीच्या आधारे पो.उ.नि. बाबुराव चव्हाण, पोहेकॉ. प्रमोद कहळे, पोकों. विठ्ठल भिसे, पोकॉ. शंकर माळगे (सर्व नेमणूक पो.स्टे. नांदेड ग्रामीण) यांनी ही कारवाई केली.
गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीवरून सय्यद इस्माईल सय्यद बशीर, रा. बळीरामपुर हा इतर चार जणांसह पत्त्याच्या ‘तिरट’ नावाच्या जुगारामध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, त्याठिकाणी ₹2,40,710/- किमतीचा मुद्देमाल सापडल्याने तो जप्त करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे कौतुक केले आहे.



