जिला

Breaking News नांदेडमध्ये रजिस्ट्री घोटाळा! हदगावचे दुय्यम निबंधक सेवलीकर निलंबित

 

नांदेड: हदगावमध्ये दस्त नोंदणीच्या नावाखाली मोठं रसायन सुरु होतं, आणि अखेर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कडक कारवाई करत दुय्यम निबंधक सेवलीकर यांना थेट सस्पेंडच केलंय.

घटनेचं मूळ काय? जिल्ह्यात एक नियम लागू आहे – “कुठल्याही तालुक्यात रजिस्ट्री करता येते.” पण या नियमाचा वापर न करता गैरवापर करण्यात आला. हदगाव कार्यालयातून 90% रजिस्ट्री बाहेरील लोकांचीच! एक-दोन नव्हे – तब्बल 190 बेकायदेशीर दस्त नोंदले गेले.

तपासणी पथक पुढे सरसावतं, 400 दस्तांची पाहणी केली… आणि धक्कादायक चित्र समोर आलं – नियम झुगारून रजिस्ट्र्या केल्या गेलेल्या.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाचाही चुकीचा अर्थ लावून गोंधळ झाला. आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि ‘फाईल’ थेट निलंबनापर्यंत पोहोचली.

या प्रकरणानंतर महसूल विभागात खळबळ माजली असून, प्रशासनातही एकच खसखस सुरू आहे – “अजून कोण कोण हातात लागणार?”

 

#नांदेड #रजिस्ट्रीघोटाळा #सेवलीकरसस्पेंड #हदगाव 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *