क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: घोरपड तस्करास पकडले, दोन घोरपडींना दिले जीवदान

नांदेड | दिनांक ९ जून २०२५ नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वन्यजीव तस्करीवर मोठी कारवाई करत दोन घोरपडींसह एक तस्कर जेरबंद केला. या धाडसी कारवाईमुळे दोन घोरपड प्राण्यांचे प्राण वाचले असून, या प्रकारावर कडक संदेश देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, मा. श्री. खंडेराव धरणे (भोकर), उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुशीलकुमार नायक आणि पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर (नांदेड ग्रामीण) यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंदासिंग कॉर्नर परिसरात छापा टाकून दशरथ यलप्पा धोतरे (वय २७, रा. काकांडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन घोरपडी आढळून आल्या — एक अंदाजे ५ किलो आणि दुसरी ३ किलो वजनाची. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ₹१६,०००/- इतकी आहे.

सदर प्रकरणाची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड यांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोहेकॉ. वसंत केंद्र, पोकॉ. असिफ, पोकॉ. जमीर, व पोकॉ. कांबळे (पोस्टे नांदेड ग्रामीण) यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी कौतुक करत सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *