क्राईम

नांदेड रेल्वे स्थानकावर प्रवाशाच्या मोबाईल व रकमेची चोरी – दोन आरोपी अटकेत, एक पसार

 

दिनांक 06.06.2025 रोजी सकाळी 06:58 वाजता, मोहम्मद आदिल (वय 25 वर्षे), राहणार – देगलूर नाका, नांदेड यांनी लोहमार्ग पोलीस (जीआरपी) नांदेड येथे तक्रार नोंदवली की, 05.06.2025 रोजी रात्री सुमारे 22:15 वाजता ते हैदराबादला जाण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर आले असता, जनरल डब्यात चढत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मोबाईल फोन व ₹2,740 रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

या तक्रारीवरून लोहमार्ग पोलीस (जीआरपी) व रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) नांदेड यांनी संयुक्त कारवाई करून नांदेड येथे गुन्हा क्रमांक 300/2025, कलम 309 भारतीय न्याय संहिता (BNSS)-2023 अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू केला. फिर्यादीच्या ओळखीवरून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचे नाव पोलिसांना कळविले आहे, तो सध्या पलायनात आहे.

सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, पलायन केलेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास जीआरपी नांदेड करीत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *