नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई – ५ मोटारसायकलींसह २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत विविध ठिकाणांहून चोरीला गेलेल्या ५ मोटारसायकलींसह एकूण २,३५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी अमेरखान पि. गोलुखान (वय २४, रा. पाण्याच्या टाकीजवळ, चौफाळा, जि. नांदेड) यास अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्री. खंडेराव धरणे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा मा. श्री. सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर (पो.स्टे. नांदेड ग्रामीण) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या तपासात अधिकाऱ्यांनी विशेष योगदान दिले: पो.उ.नि. बाबुराव चव्हाण, पो.उ.नि. ज्ञानेश्वर मटवाड, पाहे.कॉ. प्रमोद कन्हाळे (2434), पो.कॉ. विठ्ठल भिसे (916)
पो.कॉ. संघरत्न गायकवाड (493), पो.कॉ. शंकर माळगे (1459), पो.कॉ. ज्ञानेश्वर कलंदर (2907) (सर्व पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कार्यरत)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: पल्सर मोटारसायकल (MH-26-CD-6257) – किंमत ₹60,000/- हिरो ग्लॅमर (लाल- काळा रंग, पासिंग नसलेली) – चेसीस नं. MBLJAW156MGJ00812, इंजीन नं. JA07ACMGJ00678 – ₹60,000/-
हिरो CD-125 शाईन (काळा रंग) – MH-32-AN-5283, चेसीस नं. ME4JC737HJT083911, इंजीन नं. JC73ET2155222 – ₹60,000/-
हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळा रंग, पासिंग नसलेली) – चेसीस नं. 99M19F01634, इंजीन नं. 99M17E01789 – ₹30,000/-
हिरो होंडा CD-100 (काळा रंग, पासिंग नसलेली) – चेसीस नं. अस्पष्ट, इंजीन नं. 96F10E04342 – ₹25,000/- एकूण मुद्देमालाची किंमत: ₹2,35,000/-
या यशस्वी कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कृतीमुळे चोरीच्या घटनांमध्ये कमी होण्यास मदत होणार आहे.



