जबरी चोरीतील गुन्हा उघडकीस – दोन आरोपी नगदी ३०,००० मुद्देमालासह अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कार्यवाही

नांदेड — स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा एक गंभीर गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून नगदी ₹३०,००० इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. खंडेराव धरणे (भोकर), श्री. सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक श्री. मिलींद सोनकांबळे, पोहेकॉ रवीशंकर बामणे, पोकों चंद्रकांत स्वामी, पोकों तिरुपती तेलंग व पोहेकॉ सिद्धार्थ सोनसळे यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सौ. अंकिता तूपसंमीदर (वय २६, रा. वैशाली नगर, नांदेड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीबाबत तक्रार दाखल केली होती. गुन्हा रजिस्टर नंबर ३२९/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केले. गुप्त माहितीच्या आधारे आंबेडकर नगर, अर्धापूर येथून खालील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
गौरव मनोहर कांबळे (वय २२), व्यवसाय: मजुरी
संदीप ऊर्फ करण संतोष कांबळे (वय १९), व्यवसाय: मजुरी
तपासादरम्यान दोन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून ₹३०,००० नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.



