क्राईम

चोरीचा गुन्हा काही तासात उघड- इतवारा गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई, आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त”

नांदेड (11 जून 2025): नांदेड येथील इतवारा पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक संशयित आरोपी जेरबंद केला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत शंभर टक्के म्हणजेच ₹1,65,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड; मा. श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर; मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड; तसेच मा. श्री. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार: पो.नि. रणजित भोईटे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. इतवारा, पो.उपनि. रमेश गायकवाड, गुन्हे शोध पथक, पोहेकॉ: एकनाथ मोकले, मोहन हाक्के (तपास अधिकारी), लक्ष्मण दासरवार, धीरजकुमार कोमुलवार, पोकॉ: नजरेआजम देशमुख, रेवणनाथ कोरणुळे, इसराईल शेख (सर्व अधिकारी नेमणुकीवर पो.स्टे. इतवारा, नांदेड येथे)

दिनांक 11 जून 2025 रोजी फिर्यादी मोहम्मद मुदसर अन्सारी (रा. इस्लामपुरा, नांदेड) यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 10 जून 2025 रोजी रात्री 10:30 वाजता ते कुटुंबासमवेत हिलालनगर येथून इस्लामपुरा, नांदेड येथे ऑटो रिक्षाने प्रवास करत होते. दरम्यान, त्यांच्या पत्नी परवीन अन्सारी यांची पर्स मधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹1,65,000/- किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला.

सोन्याचा नेकलेस — अंदाजे ५ ग्रॅम, किंमत सुमारे ₹48,000/-
सोन्याचे झुमके — अंदाजे १० ग्रॅम, किंमत सुमारे ₹96,000/-
नगदी रक्कम — ₹21,000/- एकूण किंमत: ₹1,65,000/-

आरोपीची नाव: झफर खान पि. अहेमदखान वय: 32 वर्षे व्यवसाय: अ‍ॅटोचालक इकबालनगर, देगलूर नाका, नांदेड

पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. रमेश गायकवाड व त्यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी झफर खान यास काही तासांत ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या यशस्वी व वेगवान तपासाबद्दल मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी इतवारा गुन्हे शोध पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *