जिला

अर्धापूर व मुदखेड तालुक्यातील नुकसानीची पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना भरपाई संदर्भात सूचना

 

(प्रतिनिधी शेख सिराज )
नांदेड | १३ जून २०२५ अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेण्यात आली. या भेटीत शेतकऱ्यांच्या भावना आणि व्यथा जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.

या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या पिकांचे पुढील पाच दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. अहवालानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंबंधी लवकरात लवकर निर्णय घेता यावा, यासाठी प्रयत्न करण्याचेही ठरवले गेले.

पंचनामे जलदगतीने पूर्ण होण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर देण्यात आला. तसेच, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाबाबत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही मार्गांनी दिलेली माहिती विमा कंपनीने स्वीकारावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

या नैसर्गिक आपत्तीत ज्या शेतकऱ्यांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे, त्यांना भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचनाही बैठकीत मांडण्यात आल्या.

या बैठकीला महसूल, कृषी, वीज आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *