देश विदेश

१ जुलैपासून IRCTC तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम लागू, आधार ओळख अनिवार्य

नवी दिल्ली | १३ जून २०२५ रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १ जुलै २०२५ पासून IRCTC ने तत्काळ बुकिंगसाठी काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम IRCTC च्या वेबसाइट, अ‍ॅप तसेच पीआरएस काउंटर आणि अधिकृत एजंट यांना लागू असतील.

आधार नोंदणी अनिवार्य
१ जुलै २०२५ पासून, IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकिटांची बुकिंग फक्त आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्यांद्वारेच करता येईल.
१५ जुलै २०२५ पासून ही पडताळणी ओटीपी आधारित असेल, म्हणजे वापरकर्त्याच्या आधार-संलग्न मोबाईलवर ओटीपी येईल आणि ते टाकल्याशिवाय बुकिंग करता येणार नाही.

नॉन-आधार वापरकर्त्यांसाठी नियम
१५ जुलै २०२५ पासून, जे प्रवासी पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंट (YTSK) कडून तत्काळ तिकिटं बुक करणार आहेत, त्यांना देखील बुकिंग करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर पाठवलेला ओटीपी टाकणे अनिवार्य असेल.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *