खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतप्रकरणी तिघा आरोपींना छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक

नांदेड | १३ जून २०२५ खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत प्रकरणातील फरार तिघा आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सपोनि वि.रे.ह. घोगरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातारा परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी: साईसिंह दिपकसिंह गेहरवार ऊर्फ साई लाला (वय २५), रा. बालाजी मंदिराजवळ, सिडको, नांदेड, नितेश परमेश्वर इंगळे पाटील (वय २१), रा. शिवनगर, नांदेड
निवृत्ती ऊर्फ निलेश रावसाहेब गोरठेकर (वय २४), रा. बाबा नगर, नांदेड
या आरोपींविरोधात नांदेड ग्रामीण आणि भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.तपासानंतर साई लाला याला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तर इतर दोघांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे.



