जिला

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने रविवारपासून आमदार खासदारांच्या घरासमोर भिक मागो आंदोलन …….

दिव्यांगाचा निधी खर्च केला काय दिव्यांगासाठी आपण आवाज उठवला काय ....

 

नांदेड प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यामध्ये हजारो दिव्यांगांना आपले जीवन जगण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामुळे त्यांना जीवन जगण्यासाठी आधार मिळावा व समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांना विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून खासदार व आमदार यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात निधी वर्ग केला जातो परंतु आमदार खासदार हा निधी दिव्यांगांच्या मदतीसाठी व

त्यांना आधार देण्यासाठी हा निधीच खर्च करत नाही वर्षानुवर्षं हा निधी शासकीय कार्यालयातच राहतो त्यामुळे दिव्यांगांना जीवन जगणे अवघड जाते हा निधी खर्च केला तर अनेक दिव्यांग हे छोटे-मोठे रोजगार निर्माण करून त्यापासून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवू शकतो परंतु नांदेड जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांनी दिव्यांगांसाठी निधीच खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दिनांक 15 जून 2025 रविवार पासून आमदार खासदारांच्या घरासमोर भीक मागो आंदोलन करणार असल्याचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे,आदित्य पाटील चंपतराव डाकोरे. रवी कोकरे,

 

संजय धुलधाणी, शेख ऊमर,शिवराज बंगरवार,प्रदीप हनमंते, नागनाथ कामजळगे, सुनील जाधव,शेख ताज, मिलिंद सितळे, व्यंकट कदम, आत्माराम राजेगोरे, सय्यद आरिफ,कार्तिक भरतीपुरम,मोहसीन पठाण,शेख सिराज, मोहम्मद सईद,नारायण तांडलवार,शेख मतीन, मोहम्मद मजहर, शेख जहीर, आनंदा माणे,वसीम खान, मोहम्मद अयुब,शेख मोहसीन, हणमंतराव राऊत, पिंटू राजेगोरे, मनोज पिंपळे, नारायण नवले, प्रशांत हनमंते,राजू इराबतीन, शेख माजिद, नागेश निरडी, सईद मौलाना,

सय्यद आतिक, शेषराव वाघमारे, शेख आलीम, भोजराज शिंदे, सुधाकर पिलगुंडे,राजू शेकुरवार, रमेश हामंद.रमेश लंकाढाई, मुकदम शेख, बालाजी होनपारखे, रवी ठाळे, नामदेव बोडके, दिगांबर लोणे, उमेश भगत,नितीन पांचाळ,अनिल रामदिनवार, चांदू गवाले, मसूद मुलाजी,अजय गोरे, मुंजाजी कावळे, सिद्धोधन गजभारे,भाग्यश्री नागेश्वर, शेख शाहीन, कल्पना सकते, ऋतीका भुरेवार, सविता गवते, अफरोजा खानम आदी दिव्यांगाच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार बालाजी कल्याणकर.
आमदार आनंद बोढरकर. आमदार श्रीजया चव्हाण.
आमदार प्रताप पाटील चिखलीकर.
आमदार राजेश पवार. आमदार भीमराव केराम. आमदार जितेश
अंतापुरकर.
आमदार बाबुराव कदम कोहळीकर.
आमदार डॉ. तुषार राठोड.
विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील.
खासदार अशोकराव चव्हाण.
खासदार रवींद्र चव्हाण
खासदार अजित गोपछडे
खासदार नागेश पाटील आष्टिकर.
खासदार शिवाजी काळगे.
आदींच्या घरासमोर सकल दिव्यांग संघटनेचे भीक मागो आंदोलन…

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *