नांदेड पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा – हॉटेल व आस्थापना वेळेवर बंद करणं बंधनकारक!

नांदेड, १३ जून: नांदेड पोलीस परिक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत की हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापना रात्री 10 ते 12 या वेळेत फिरून तपासाव्यात आणि निर्धारित वेळेनंतर कोणतेही हॉटेल उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
या कारवाईचा उद्देश म्हणजे – बेकायदेशीर मद्यविक्रीला आळा घालणे, गुटखा, पानमसाला व तंबाखू यासारख्या प्रतिबंधित वस्तूंची विक्री थांबवण, गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवणे
शहाजी उमाप यांच्या सूचनेनुसार, स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी स्वतः रात्री फिरून तपासणी करावी.
त्याचप्रमाणे, त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षकांना ही कारवाई सुनियोजितपणे आणि नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
ही खबर नांदेड व आसपासच्या जिल्ह्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे, कारण अशा प्रकारच्या पावलंमुळे कायद्याचे वर्चस्व टिकते आणि समाजात सुरक्षिततेचा संदेश जातो.
वेळेत बंद न करणाऱ्या हॉटेल्सवर आता होणार कारवाई!
स्वच्छ आणि सुरक्षित समाजासाठी पोलिसांची पावले अधिक ठाम!
नागरिकांनी सहकार्य करावे व गैरप्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



