जिला

हजारो दिव्यांगांनी भीक मागत आमदार खासदार निधीसाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर काढला मोर्चा

 

नांदेड प्रतिनिधी : दिव्यांगांसाठी असलेला खासदार आमदार निधी खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. लाखो रुपयांचा निधी खासदार आमदार खर्च करत नसल्यामुळे दिव्यांगाचे पुनर्वसन होत नाही. छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याला आर्थिक मदत मिळत नाही. हा निधी खर्च करावा या मागणीसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या शिवाजीनगर नांदेड येथील घरावर भिक मागत, आंदोलन करत. मागण्यांचे निवेदन घेऊन मोर्चा धडकला, या मोर्चामध्ये हजारो दिव्यांगांनी सहभाग घेतला होता, आमदार खासदारांनी दिव्यांग निधी त्वरित खर्च करावा दिव्यांगांना जगण्याचं बळ द्यावं या मागणीसाठी हा मोर्चा खासदार चव्हाण यांच्या घरावर धडकला.

राज्य व केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर निधीही दिला जातो खासदारांना व आमदारांना निधी खर्च करण्याचा अधिकार दिला जातो व त्यांच्या खात्यामध्ये निधी दिला जातो परंतु स्थानिक खासदार आमदार हा निधी वर्षानुवर्षं खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांना शासनाच्या योजना मिळत नाहीत. यासाठी वारंवार तक्रार निवेदन देऊनही आंदोलन उपोषण करूनही आमदार खासदारांनी निधी खर्च केला नसल्याने सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज खासदार आमदारांच्या घरावर भीक मागो आंदोलन करत मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा शिवाजीनगर येथील ओम हॉटेलपासून भिक मागत-मागत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरावर धडकला. या मोर्चामध्ये संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे, चंपतराव डाकोरे, आदित्य पाटील.नागनाथ कामजळगे,रवि कोकरे.शिवाजी सुर्यवंशी.किरणकुमार न्यालापल्ली.लक्ष्मीकांत जाधव.शिवराज बंगरवार, मोहसिन पठाण,राजु शेकुरवार,कार्तिक कुमार भरतीपुरम.शेषेराव वाघमारे,सय्यद आरिफ, सुनिल जाधव.गोविंद बोद्देवाड,दिनेश डुमने.सय्यद आतिक.शेख मुबीन.मसुद मुलाजी.शेख माजीद.अजय गोरे.राजु इराबत्तीन, नागेश निरडी.थोरकर.सिद्धोधन गजभारे.शेख आलीम.राजेश फरकंडे.अनिता लोणे.भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, सविता गवते यांच्यासह हजारो दिव्यांग बांधव भगिनी सहभागी झाले होते.

आमदार राजेश पवार हे घरी नसल्याने त्यांच्या घरी कोणीच निवेदन स्वीकारायला नसल्याने दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांच्या गेटला निवेदन चिटकून निदर्शने करण्यात आली.

भिक मागो आंदोलनामध्ये माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी एक हजार एक रुपया खासदार आमदार यांना भीक म्हणून दिला. तसेच सामान्य नागरिकांकडून खासदार आमदारांना १,रूपया,२ रूपया,५ रूपये ,१० रूपये आणि २० रूपये अशा प्रकारची भीक देण्यात आली.

 

भोकर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांवर निधी खर्च करणार असून त्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने दिव्यांगांचा निधी खर्च करणार आहे.
अद्याप मला प्रशासनाच्या वतीने कोणत्याच प्रकारचे पत्र मिळाले नसून प्रशासनाने आदेशाची प्रत मला दिली नाही. त्यामुळे मी दिव्यांगांच्या निधी खर्चाबाबत प्रशासनाशी चर्चा करून त्वरित दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लावून खासदार आमदारांचा निधी खर्च करणार असल्याचे शिष्टमंडळास माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले नंतर जिल्ह्यातील व राज्यातील दिव्यांगांवर हा निधी खर्च करणार.. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *