जिला

युवक काँग्रेसचा खड्डे मुक्तीसाठी याल्गार बेशरमाचे झाडे लावून निषेध जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांचा पुढाकार

 

मुदखेड, तालुका प्रतिनिधि

दरेगाव ते डोंनगाव या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने खड्ड्यांत बेशरमाचे झाडे लावून निषेध नोंदवत याल्गार पुकारला आहे.

मुदखेड ते टाकळी या रस्त्यावरील गावांसाठी परिवहन महामंडळाची तीन वेळा बस सेवा आहे. या रस्त्याचे अंतर जवळपास २१ किमी आहे. या रस्त्यावरील गावातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करण्यासाठी हा एकमेव पर्यायी रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून सर्वांची हेळसांड होत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा गाठता येत नाही, तर रुग्णांच्या उपचारांमध्येही मोठे हाल होताना दिसून येतात. यासंदर्भात युवक काँग्रेसने वेळोवेळी जनआंदोलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. खड्डे बुजवण्याच्या नावाखाली थातुरमातुर कामे करून कोट्यवधींची कामे केली जातात आणि बिले उचलली जातात.

युवक काँग्रेसच्या वतीने दि. (सोमवार) खड्डे मुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या अनुषंगाने दरेगाव ते डोंनगाव रस्त्यावर संतप्त ग्रामस्थांनी खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडले आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील मुंगल यांनी खड्ड्यांत बेशरमाची झाडे लावून शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला आहे.

या वेळी श्याम पाटील शिंदे, केशव पाटील शिंदे, माणिकराव मुंगल, संभाजी गाढे, अनिल कुरे, चक्रधर कुरे, रामदास शिंदे, साटवाजी शिंदे, बापूजी गाढे, दामोदर गाढे, करण गाढे, भगवान गाढे, अंताजी पाटील वाहिंदे, सतीश राहेरे, कृष्णा राहेरे, गणपती शिंदे, शहाजी गाढे, अक्षय गाढे उपस्थित होते.

भोकर विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा हा मतदारसंघ असून देखील लोकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. येथे तरुण आमदार आहेत, भाजपचं सरकार आहे — त्यांनी जास्तीत जास्त निधी आणून कामे करणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही.
— बालाजी गाडे पाटील
जिल्हाध्यक्ष युवक कॉंग्रेस नांदेड

“मुदखेड तालुक्यात मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून युवक काँग्रेसने गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडले आहे. या पुढेही शासनाने लक्ष न दिल्यास आणि खड्डे बुजवले नाहीत, तर रस्त्यावर उतरून बालाजी गाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
— प्रशांत पाटील मुंगल, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *