क्राईम

भाग्यनगर पोलीसांची यशस्वी कारवाई: जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड, तिघांना अटक, मोबाईल, घड्याळ, स्कुटी व खंजर जप्त

 

नांदेड, प्रतिनिधी: भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आणत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, एक घड्याळ, गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि खंजर असा एकूण 1,10,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे व त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी केली.

आरोपींची नावे व पत्ते: वैभव पी. महेंद्र सुर्यतळे (वय 21), रा. काबरानगर, नांदेड
निखील पी. संभाजी बाटोरे (वय 19), रा. सुमेधनगर, कॅनॉल रोड, नांदेड
आर्यन पी. राहुल परांडे (वय 19), रा. लोकमित्रनगर, नांदेड

गुन्ह्याचा तपशील: दिनांक 14 जून 2025 रोजी सकाळी 4.35 वाजता मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या फिर्यादीस उदयनगर-2, कृष्णा दूध डेअरी समोर खंजराचा धाक दाखवून मोबाईल व घड्याळ हिसकावून नेले. त्यानंतर सकाळी 5.10 वाजता अंबिका मंगल कार्यालयाजवळ दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावण्याची घटना घडली.

या दोन्ही घटनांवरून पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे अनुक्रमे गु.र.नं. 336/2025 व 340/2025 नोंदविण्यात आले आहेत.

तपास आणि कारवाई: गुन्हे घडल्यानंतर, पोलीस निरीक्षक श्री. रामदास शेंडगे, पो.उ.नि. विनोद देशमुख, पो.उ.नि. नरेश वाडेवाले, पोहेकॉ. गर्दनमारे, पोकॉ. मुंडे, पोकॉ. चापके, पो.स्टे. विमानतळ येथील पोका. शेख शोयब, पोकॉ. माने यांचे संयुक्त पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

गोपनीय माहिती व CCTV फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्या नातेवाईकांकडून सर्व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

ही 100 टक्के मुद्देमाल वसुली आणि गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक मा. अभिनाश कुमार यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केले आहे.

भाग्यनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून, गुन्हेगारांमध्ये धडकी बसली आहे.

 

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *