शिक्षण

श्रीनिकेतन शाळेत शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

नांदेड/प्रतिनिधी.. दीपक नगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत दीर्घ सुट्ट्या नंतर सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश उत्सव मुख्याध्यापिका डॉ.सौ‌.एस.एन.राऊत यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत यांच्या संकल्पनेतून आयोजित विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश उत्सवात शाळेच्या प्रेवेशद्वारावर सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले होते.

विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर येताच शाळेची विद्यार्थिनी कु.स्नेहल पोतरे यांनी फीत कापून शाळा प्रवेशाचा शुभारंभ करताच सर्वप्रथम मुख्याध्यापिका डॉ.सौ. राऊत यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करून भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकांनी मोठी गर्दी केली होती. प्रवेश उत्सवात घोडे जैसी चाल, हाथी जैसी धूम या गीतावर विद्यार्थ्यांनी ठेका धरून आनंद उत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभा नंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिकासह सर्व शिक्षकांनी आपला परिचय करून देऊन दिला व सोबतच विद्यार्थीही यावेळी आपल्या वर्ग पदोन्नतीसह आपला परिचय दिला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध मोफत पाठ्यपुस्तके मुख्याध्यापिका डॉ.सौ. राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितीत सर्व विद्यार्थी आनंदी व उत्साही दिसून आले, कार्यक्रमात शालेय पोषण आहारास विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेश उत्साहात शाळेतील शिक्षक अविनाश इंगोले, बाळकृष्ण राठोड, सुदर्शन कल्याणकर, श्रीधर पवार,सौ. सुरेखा मरशिवणे , प्रल्हाद आयनेले,गतिश मगरे,बालवाडी शिक्षिका बुद्धांना गोखले आदींनी सहभाग नोंदवला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *