जिला

पद्मशाली समजातील दि. 29 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर

 

नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन शिबिर दिनांक 29 जुन 2025 वार रविवार सकाळी 10 वाजता शुभारंभ मंगल कार्यालय, ITI परिसर, लेबर कॉलनी नांदेड येथे संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमात राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अनेक प्रशासकीय नवनियुक्त उच्चपदस्त अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थतीत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी पद्मशाली समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी ७०% टक्के व त्यापेक्षा वर गुण असलेल्या तसेच NEET (MBBS,BAMS) JEE, IIT परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त करून प्रवेशास पात्र असलेले विद्यार्थी ,5 वी, 8 वी शिषयवृत्तीधारक, नवोदय पात्र विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक तसेच नवनियुक, पदोन्नत, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व समाज संघटनेच्या पदाधकाऱ्यांशी सम्पर्क करुन साधून मार्कमिमो देणे व वरील प्रमाणे कर्मचारी बांधवानी आपली नोंदणी दिनांक २५ जून २०२५ पर्यंत आपली नोंदणी करून या सामाजिक कार्यास सहकार्य करावे ही विनंती. (गुणपत्रकावर आपला पत्ता व पालकांचा मोबाईल नंबर टाकावा ही विनंती.) सदरील कार्यकमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित रहावे व आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आव्हान महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नागभूषण दुर्गम यांनी केले आहे.

आपली नोंदणी दिनांक २५ जून २०२५ पूर्वी खालील पदाधिकारी यांच्याशी किंवा समाज संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून नाव नोंदणी करून घ्यावी.
नारायण अडबलवार (नोंदणी विभाग प्रमुख) मो.नं.९४२१४८६६३९
विजय चरपिलवार, प्रा.शंकरराव कुंटुरकर, संतोष गुंडेटवार,गणेश भुसा, शिवाजी अन्नमवार, विजय वडेपल्ली,नरसिंग गुर्रम,नरसिमलू वंगावार, सत्यजीत टिप्रेसवार, गणेश कोकुलवार, प्रा.विजय उपलंचवार, डॉ. बालाजी नीलपत्रेवार, उमेश कोकुलवार, धनंजय गुम्मलवार, मनोहर संगमवार, संतोष गुम्मलवार, व्यंकटराव चीलवरवार, नागभूषण भुसा,रविंद्र कोमटि, दत्ता कोम्पलवर, पुरषोत्तम तालकोकुलवार, व्यंकटेश मुलुकवार, लक्ष्मण गुडेवार, नागभूषण सामलेटी, गणेश शिवरात्री, राजेंद्र हसनल्ली, सचिन रामदीनवर, सतपाल मेका साईराम मेडिकल, वामनगर, नांदेड

सागर गुडेवार
सागर इलेक्ट्रिकल, तरोडा नाका (शेतकरी चौक) नांदेड.
मलेशजी बल्ला
कनिष्क टेलर, महावीर चौक, नांदेड.
नरसिंग जिडेवार (भोकर)
नाथा गंगुलवार (हिमायत नगर)
संतोष ताडेवार (माहूर किनवट)
नागेश बबिलगेवार
धोंडिबा तेलेवार , (उमरी)
राम चिलकेवार (धर्माबाद)
राजकुमार दाचावार (बिलोली)
शिवाजी रामदीनवार (नायगाव)
सचिन रामदीनवार (मुखेड)
सुर्यकांत दासरवार (देगलूर)
हिराप्रकाश बोड्डावार , गजानन बोड्डावार (लोहा कंधार)
सिरमेवार (मुदखेड) वरील पदाधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *