अतिसार प्रतिबंध मोहीम, जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

नांदेड – अतिसारामुळे होणारे बाल मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत विविध उपक्रम राबवून स्टॉप डायरीया अभियान यशस्वीरित्या राबवणे असे निर्देश जिल्हाअधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉप डायरिया कॅम्पेन याबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली . राज्यातील अर्भक मृत्यू दर बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. देशांमध्ये पाच वर्षाच्या बालकाच्या मृत्यू मागे अतिसार हे मुख्य कारण असून 4.8 टक्के बालके अतिसाराने दगावतात आणि बाल मृत्यूचे प्रमाण उन्हाळा पावसाळा जास्त असते. ” अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओ.आर.एस ची घेऊन साथ ” या घोषवाक्याचा अवलंब करून स्टॉप डायरिया अभियान यशस्वीपणे राबवणे अतिसार झालेल्या सर्व मुलांकरिता वाटप होईल व त्याच्या मार्फत ते पोहोचेल हे सुनिश्चित होईल.
पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंधक आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे काळजी घेण्याचे योग्य समुपदेशन करावे. स्टॉप डायरियाचे अंतिम ध्येय अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे अंतिम ध्येय आहे.पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात सर्व ग्रामपंचायत मध्ये जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृतीसाठी घरोघरी जाऊन मोहीम राबवणे शाळा, अंगणवाडी यामध्ये दररोज स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे प्रात्यक्षिक करून दाखवणे. प्रत्येक शाळेमध्ये विशेष स्वच्छता संमेलन भरण्यात यावे.यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी प्रत्येक शाळा, अंगणवाड्या, प्राआ केंद्र, उपकेंद्र येथे ORS व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात यावे व प्रोटोकॉल लावण्यात यावा अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी दिले आहेत.
दि. 16 जून ते 31 जुलै पर्यंत विविध उपक्रम, नागरिकांमध्ये जनजागृती
पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुक करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येते.तसेच स्वच्छता ही तितकीच महत्त्वाचे आहे यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.
शाळा स्तरावर जनजागृती
शालेय स्तरावर चित्रकला, निबंध लेखन घोषवाक्य, लेखन स्पर्धा ही अतिसाराचा सामना करण्यासाठी सुरक्षित पाण्याचा वापर या विषयावर आयोजन करण्यात येणार शालेय विद्यार्थी,शिक्षण, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षितपणे पाणी वापरण्याच्या महत्त्वाबाबत गाव, ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती जनजागृती रॅली, दर्शनीय ठिकाणी पोस्टर,बॅनर,लावणे सुरक्षित पाणी पिण्याचे महत्त्व सांगणे, हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवणे यांना प्रोत्साहन देणे,यासारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रशांत थोरात,वी प्रमुख बालरोग तज्ञ डॉक्टर किशोर राठोड, शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना फुटाणे , जिल्हा माता बोल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, स्थानिक प्रतिनिधी डॉ. प्रल्हाद कोटकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्रीमती रेणुका दराडे आदी उपस्थित होते.



