क्राईम

पोलीस स्टेशन बारड हद्दीतील जबरी चोरी प्रकरणात आरोपी अटकेत,

 स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई — ₹66,300/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने एका आरोपीस अटक करून एकूण ₹66,300/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीसह त्याच्या साथीदारांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

अटक आरोपीचे नाव: सागर नाथाकाशीनाथ गवळे, वय 18 वर्षे 1 महिना, रा. गौतमनगर, सांगवी, ता. जि. नांदेड

जप्त मुद्देमाल: realme 11 pro मोबाईल – ₹13,300/-, रोख रक्कम ₹1,300/-
oppo मोबाईल – ₹20,000/-, realme मोबाईल – ₹18,000/-, oppo मोबाईल – ₹15,000/- एकूण किंमत: ₹66,300/-

नांदेड जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आउट’ अंतर्गत तपास कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार, पो.नि. श्री. उदय खंडेराय (स्थानीय गुन्हे शाखा नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश कोरे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

दिनांक 18 जून 2025 रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी सागर गवळे गौतमनगर, सांगवी येथे थांबलेला असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी —

रवि खिलारे, रा. पावडेवाडी ओम उर्फ ओम्या सूर्यवंशी, रा. गौतमनगर सांगवी
— मिळून पो.स्टे. बारड गु.र.नं. 74/2025 अंतर्गत कलम 309(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा केल्याचे मान्य केले.

तपासादरम्यान तिघांकडून वरील मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी बारड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
या गंभीर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

नांदेड पोलिसांची ही जलद आणि अचूक कारवाई गुन्हेगारीवर रोख बसवणारी ठरत आहे.

 

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *