मनोरंजन

भीमाचा शिक्का, हुकमी एक्का जगाच्या मार्केटमधी…

रॉकस्टार राहुल साठेंच्या भीमगीतांनी रसिकांची मनं जिंकली

 

नांदेड,20- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भीमगीत गायन कार्यक्रमात रॉकस्टार राहुल साठे यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक दमदार गीतांनी उपस्थितांची मनं जिंकली.

गुरुवार दिनांक 19 जून रोजी नांदेड येथील ओम गार्डनमध्ये झालेल्या या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्य प्रशासन विभागाचे उपमु ख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, अमित राठोड, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, माजी सहाय्यक गटविकास अधिकारी बाबुराव पुजरवाड, तसेच संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष रणजित गजभारे, सचिव धनंजय गुम्मलवार, कार्याध्यक्ष राजेश जोंधळे, कोषाध्यक्ष सचिन चौदंते, राघवेंद्र मदनूरकर, पवन तलवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मुंबई येथील प्रसिद्ध गायक राहुल साठे आणि त्यांच्या संचाने कोणीबी ऐऊद्या गावात…, लई पॉवर भीमाच्या नावात… भिमाचा शिक्का, हुकमी एक्का जगाच्या मार्केटमधी…, जगात मी देखणी गं, मी भीमाची लेखणी…, जातीवाद्याची आरं निघून गेली भीती जवा भीमाने मारली मिठी… यांसारखी दर्जेदार भीमगीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्‍मा ज्‍योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ व फुल देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे म्हणाले, जिल्हा परिषद दरवर्षी महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त प्रबोधनपर कार्यक्रम, रक्तदान शिबीर, अन्नदान यासारखे उपक्रम आयोजित करते. विचार रूजवण्यासाठीच गीतगायन कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयुक्त जयंती समितीचे अध्यक्ष रजणित गजभारे यांनी केले. त्यांनी फुले-आंबेडकर विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संयुक्त जयंती साजरी करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक महालिंगे, नंदलाल लोकडे, गजानन आगरमोरे, व्हि.टी. कोकरे, रेनगुंटवार, शिवराज कोल्हे, हाळे, योगेश वाघ, राहूल झगडे, प्रमोद गायकवाड, सचिन गुंडाळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *