जिला

आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

 

 

नांदेड, २०- ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्यात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, गाव स्वच्छता व पर्यावरणीय उपक्रम राबविले जाणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.

हरित योग या संकल्पनेअंतर्गत यावर्षी योग दिन साजरा होत असून पारंपरिक योगासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे योगसत्रासोबत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, जलस्रोत व पायाभूत सुविधांची स्वच्छता आणि पर्यावरणीय जागृती हे घटकही कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आज होणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यासाठी योग संगम पोर्टलवर नोंदणी व मार्गदर्शक सूचना QR कोडव्‍दारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच योग सत्रे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केलेल्‍या स्‍वच्‍छ परिसरात योगाचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

२१ जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथून देशव्यापी योग संगम कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सकाळी ६:३० ते ७:४५ या वेळेत होणार असून, त्याचवेळी जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये सामूहिक योगसत्र पार पडणार आहे. गाव स्‍तरावरील ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांनी स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे आयोजन करताना परिसर स्वच्छता, पायाभूत सुविधा व जलस्रोत स्वच्छ ठेवावेत, तसेच सहभागाचे छायाचित्र शासन संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.

गाव स्‍तरावर सदर उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी ग्रामस्‍थानी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जल जीवन‍ मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल रावसाहेब, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सौ. पी.आर. पवार, जिल्हा माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे व जिल्हा समन्वयक सुशिल मानवतकर यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *