जिला

गंजेगाव नदिकाठावरील हजारो ब्रास अवैध रेती साठा जप्त करून गुन्हा दाखल करा – राहुल जिगळेकर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी

 

जिल्हाप्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर यांनी पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे बिलोली यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे की, मौजे गंजगाव येथील नदी काठावरील चोरीने सुपीक जमीनीवर शासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या रात्रंदिवस रेती साठा ५-७ हजार ब्रास केलेला जप्त करून चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, गट क्रमांक २८० व गट क्रमांक ३२५ आणि घरकुलासाठी शासकीय गटातील राखीव ठेवलेल्या गटातून मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस अनावश्यक पोकलेन मशीन -८ व सेक्शन पंप २ च्या सहाय्याने शासन नियम अटी भंग करत शेती जमीन मालकाच्या नावाने ठेका घेऊन शासनाने दिलेल्या अटि व शर्तीचे भंग करत तेलंगणातील श्रीनिवास राव व गंगप्पा नामक व्यक्ती यांना हस्तांतरण करून मोठ्या प्रमाणात कृषक जमीनीवर ५-७ हजार ब्रास अवैधरित्या रेती साठा जमवलेला असल्याचे तक्रारीत म्हणत सदरचा साठा जप्त करून चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर यांनी पोलीस निरीक्षक बिलोली यांच्याकडे केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *