मनोरंजन

राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी पात्र-अपात्र यादी जाहीर; हरकतींसाठी १० जुलैपर्यंत मुदत

 

 

नांदेड,२६- जिल्हा परिषद नांदेडच्या ग्रामपंचायत विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृध्‍द कलावंत मानधन योजना २०२४-२५ अंतर्गत पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण १ हजार ४३२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९५४ अर्ज पात्र तर ४७८ अर्ज अपात्र ठरले आहेत.

लाभार्थ्‍यांची पात्र-अपात्र यादी जिल्‍हा परिषदेच्‍या संकेस्‍थळावर व सुचना फलकावर प्रसिध्द करण्‍यात आली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या अर्जदारांना हरकती व दावे सादर करण्याची संधी देण्यात आली असून, त्यासाठी ५ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ७ जुलै रोजी सुधारित यादी तयार केली जाईल. अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी १० जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्राम पंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी दिली आहे.

अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती अथवा दावे विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या अर्जदारांचे अपात्र यादीत आपले नाव आले आहे, त्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह आपली माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्‍यात आली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *