क्राईम

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : गावठी पिस्तूल, काडतूस आणि तीन मोटारसायकलसह दोन आरोपी ताब्यात

 

नांदेड – नांदेड जिल्ह्यात मोटारसायकल चोरी व अवैध शस्त्रधारणा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना मोठे यश मिळाले आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि तीन मोटारसायकल असा एकूण 1,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींची नावे: अंकुश रामदास भगत (वय 19), रा. रत्नेश्वरी नगर, माळटेकडी, नांदेड (मोटारसायकल चोरी) शैलेश किशन जाधव (वय 19), रा. राजनगर, नांदेड – (गावठी कट्टा बाळगणारा)

जप्त मुद्देमाल: तीन स्प्लेंडर प्लस मोटारसायकल्स – अंदाजे किंमत ₹1,25,000
एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस – अंदाजे किंमत ₹32,000
एकूण रक्कम: ₹1,57,000

मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवि वाहुळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिनांक 9 जुलै 2025 रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अंकुश भगत याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सोनखेड आणि भाग्यनगर परिसरातून तीन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर गाड्या जप्त करून तो पोलीस स्टेशन सोनखेड यांच्या ताब्यात देण्यात आला.

त्यानंतर 10 जुलै रोजी पुन्हा एकदा माहितीवरून शैलेश जाधव यास राजनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे.

ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे. अशा प्रकारे नांदेड पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक कारवाई होत असून शहराच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *