जिला

अर्धापूरातील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी नेहमीच येतात उशिरा आणि जातात लवकर

भोकर विधानसभेच्या आमदार व नांदेड जिल्ह्यातील खासदारांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज

 

 

अर्धापूर:- उध्दव सरोदे – अर्धापूर शहरात असलेल्या एकाही शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी कधीच वेळेवर येत नाहीतच परंतु मुख्यालयी सुध्दा कोणीच राहत नाहीत.तर शासकीय निवासस्थाने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधली असून ते धुळखात पडून आहेत.येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराला वैतागलेल्या नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच भोकर विधानसभेच्या आमदार अॅड.श्रीजया चव्हाण व नांदेड जिल्ह्यातील खासदारांना भेटणार आहेत.अर्धापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरात सर्वच शासकीय कार्यालये आहेत.या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेहमीच उशिरा येतात आणि लवकर निघून जातात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.

अधिकारी व कर्मचारी नेहमीच उशिरा येत असल्याने सर्वसामान्य माणसाला आपल्या कामासाठी ताटकळत बसावे लागते.या मनमानी व एकाधिकार शाहीच्या कारभाराला अर्धापूर शहर व तालुक्यातील नागरिक वैतागले आहेत.शहरामध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,नगर पंचायत कार्यालय,ग्रामीण रूग्णालय, तालुका कृषी कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग,शासकीय वसतिगृह, वनविभाग कार्यालय,पशुसंवर्धन दवाखाना,दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय,भुमि अभिलेख कार्यालय,जलजीवन पाणी पुरवठा विभाग,एकात्मिक बालविकास कार्यालय,

विज वितरण कंपनी,शासकीय बँका,सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळा आणि महाविद्यालय या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेहमीच उशिरा येतात आणि लवकर निघून जातात. यामुळे नागरिकांचे कामे जागोजागी खोळंबली आहेत.शहरात एकही अधिकारी किंवा कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. सर्वच विभागातील अधिकारी,कर्मचारी व सर्व पदधारकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून निवासस्थाने बांधती आहेत. पण या निवासस्थानात एकही कर्मचारी राहत नाही. ही महाभयंकर समस्या लवकरात लवकर दुर होवून आमची सर्वच कार्यालयातील वेळेत व लवकर व्हावीत अशी नागरिकांनी मोठी मागणी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *